
मुंबईहून वाराणसीला चाललेल्या विमानात महिलेचा मृत्यू झाल्याने विमानाचे संभाजीनगरच्या चिखलठाणा विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. सुशिला देवी असे मयत महिलेचे नाव आहे. महिलेचा मृतदेह सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
मयत महिला ही मिर्झापूरची रहिवासी असून मुंबईहून वाराणसीला चालली होती. मुंबई-वाराणसी इंडिगो विमानाने मुंबईहून वाराणसीसाठी उड्डाण केले. यानंतर विमान मिडएअर असतानाच महिलेची तब्येत बिघडली. क्रू मेंबरने पायलटला याबाबत माहिती दिली. यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील चिखलठाणा विमानतळावर विमानाचे एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
विमान चिखलठाणा विमानतळावर उतरताच विमानतळावरील वैद्यकीय पथकाकडून महिलेची तपासणी करण्यात आली. डॉक्टरांनी महिलेला मृत्य घोषित केले. यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विमान वाराणसीसाठी रवाना झाले.