मुंबई विद्यापीठाची नवीन पदवी प्रमाणपत्रे दहा दिवसांत

सुमारे दीड लाख सदोष पदवी प्रमाणपत्रांपैकी सवा लाख प्रमाणपत्रांचे वाटप मुंबई विद्यापीठाने कॉलेजांना केले आहे. त्यामुळे ही सर्व प्रमाणपत्रे विद्यापीठाला परत मागवावी लागणार आहेत. आतापर्यंत 111 महाविद्यालयांनी सदोष प्रमाणपत्रे परत पाठवली आहेत. दरम्यान, विद्यापीठाने नवीन प्रमाणपत्रे छापण्यास दिली असून पुढील दहा दिवसांत ती विद्यापीठाकडे येतील आणि त्यांचे वितरण तातडीने करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी डेप्युटी रजिस्ट्रार डॉ. हिंमत चौधरी यांच्या कार्यालयात जाऊन माहिती घेतली. विद्यापीठाने नवीन प्रमाणपत्रे छापण्यास दिली असून पुढील दहा दिवसांत ती विद्यापीठाकडे येतील आणि त्यांचे वितरण तातडीने करण्यात येईल अशी माहिती डॉ. चौधरी यांनी दिली.