
मुंबई विद्यापीठ नोंदणीकृत पदवीधर युवासेना सिनेट सदस्य तसेच (बुक्टू) शिक्षक मतदार संघाचे सिनेट सदस्यांनी आज मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट भागात आंदोलन केले. पण विद्यापीठ प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला.
विद्यापीठाने दुजाभाव करत पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन आझाद मैदानात घेऊन गेले. दोन महिन्यांपूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संघटनेने कलिना कॅम्पस येथे तब्बल दोन दिवस आंदोलन केले. तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही. पण आज युवासेनेच्या धरणे कार्यक्रमाला सर्व आजी माजी सिनेट सदस्य असतानाही पोलिसांनी कारवाई करण्यात केली. युवासेनेने याचा तीव्र निषेध केला.
या आंदोलनावेळी युवासेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे,अल्पेश भोईर, किसन सावंत आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर उपस्थित होते तर बुक्टू या संघटनेच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती तप्ती मुखोपाध्याय,मधू परांजपे,शांती पोलिमोरी,अनुपमा सावंत,ज्योती पेटकर,स्वाती लावंड,चंद्रशेखर कुळकर्णी, जितेंद्रनाथ झा,हनुमंत सुतार,सखाराम डाखोरे,सोमनाथ कदम,ताहीर मोहम्मद,उत्तम यादव, शरद त्रिपाठी उपस्थित होते.