मुंबई विद्यापीठ दूरस्थ शिक्षण विभाग (IDOL) च्या वतीने आज मंगळवार, 14 जानेवारी 2025 रोजी होणाऱ्या एमए., एमकॉम, एमएससी. यासह तेरा विषयांची पहिल्या सत्राची परीक्षा होणार आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्र(Hall Ticket),परीक्षेला बसण्याची व्यवस्था याची माहिती IDOL येथे अगदी वेळेवर देण्यात येत आहे. याबाबी किमान तीन दिवस अगोदर होणे गरजेचे होते. परंतु तसे न झाल्यानं परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं.
यासंदर्भात बोलताना युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी, ‘मुंबई विद्यापीठाचे सर्व अधिकारी राजकारण करण्यात मश्गूल असून विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले आहे, पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाच्या IDOL विभागाचा आणि विद्यापीठाचा भोंगळ कारभार समोर आला आहे’, अशा शब्दात टीका केली.