
मुंबई विद्यापीठ आणि राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेले संशोधन प्रकल्प पूर्णत्वास आले आहेत. या दोन्ही संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या 10 प्रकल्पांचे विविध निष्कर्ष समोर आले असून यातील 3 प्रकल्प पेटंटसाठी केंद्रीय संस्थेकडे दाखल करण्यात आले आहेत. तर 3 शोधनिबंध, 32 शिक्षकांसह 161 विद्यार्थ्यांना या संशोधनातून लाभ मिळाला आहे. विशेष म्हणजे 4 शेतकऱयांनाही या संशोधन प्रकल्पांचा लाभ झालेला आहे. तसेच 5 अपुशल कामगारांना प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात आले.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी व समाजाभिमुख नाविन्यपूर्ण संशोधन करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई विद्यापीठ आणि राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग महाराष्ट्र शासन यांच्यात 25 मे, 2022 रोजी सामंजस्य करार करण्यात आला होता. या करारान्वये मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिह्यातील संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकांकडून या प्रकल्पाअंतर्गत विद्यार्थी विकास विभागामार्फत संशोधनासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. या तिन्ही जिह्यांतील संलग्नित महाविद्यालयातून 190 प्राथमिक प्रस्ताव विद्यापीठास प्राप्त झाले होते.
या प्रकल्पांना मिळणार पेटंट
– डॉ. मीनल पाटील यांनी रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी मोजण्यासाठी पोर्टेबल डिवाइस तयार केले आहे. या डिवाइसच्या मदतीने रक्तातील एका थेंबापासून हिमोग्लोबिनची पातळी अचूक ओळखता येईल.
– डॉ. अरुण चांदोरे यांनी दुर्मिळ आणि नष्टप्राय होत असलेल्या रान जांभूळ वनस्पतीच्या संवर्धनाची पद्धत विकसित केली आहे. औषधी गुणधर्म असलेल्या या वनस्पती पासून त्यांनी पेशींना रंग देण्यासाठी रंगद्रव्य तयार केले.
– डॉ. दिलीप यादव यांनी क@न्सरच्या उपचारांसाठी नागवेल झाडापासून कँप्टोथेशिम द्रव्य काढण्यासाठी नवीन पद्धत विकसित केली. तसेच प्लांट टिश्यू कल्चर संवर्धन करायची पद्धत विकसित केली.