
मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या उन्हाळी सत्राच्या बीकॉम सत्र 6 ची परीक्षा मंगळवारपासून सुरू होत आहेत. 284 परीक्षा पेंद्रांवर एकूण 54,892 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
बीकॉमसह स्वयंअर्थसहाय्यित बीएएमएस, अकाऊंटिंग फायनान्स आणि बँकिंग अँड इन्श्युअरन्ससह इतरही अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व परीक्षांची हॉल तिकिटे विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या सर्व परीक्षांना एकूण 82,995 एवढे विद्यार्थी बसले आहेत. यात 73,309 नियमित व 9,692 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी आहेत. तर एकूण 39,617 मुली आणि 43,377 मुलगे आहेत.