मुंबईच्या उपनगरी लोकल रेल्वेमध्ये 11 जुलै 2006 रोजी साखळी बॉम्बस्फोट झाले. यातील दोषींच्या अपिलांवरील 15 जुलै 2024 पासून सुनावणी घेण्यात आली. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या विशेष खंडपीठासमोर आज दोषींच्या अपिलांवर सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. दहशतवाद्यांनी प्रेशर कुकरमध्ये टाईमबॉम्ब ठेवत मुंबई लोकलमध्ये 11 मिनिटांत 7 बॉम्बस्फोट घडवले होते. याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने 13 पैकी 5 आरोपींना फाशीची व उर्वरितांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या दोषींनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले तर फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी राज्य सरकारने हायकोर्टात अर्ज केला होता. विशेष खंडपीठासमोर गेले सहा महिने त्यावर सुनावणी झाली.