मुंबईवरून नांदेडला निघालेल्या नदीग्राम एक्सप्रेसला आग लागल्याची घटना आज सायंकाळी कसारा परिसरात घडली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने घटना स्थळी गाव घेतली आणि ही आग विझवली. त्यामुळे मोठी जीवितहानी टाळली.
नांदेडच्या दिशेने जात असलेली नंदिग्राम एक्सप्रेस आज सध्याकाळी 7च्या सुमारास कसारा रेल्वे स्थानकापासून 700 मिटर दूरवर एका सिग्नलला थांबली. त्या वेळी अचानक एक्सप्रेसच्या एका आरक्षित बोगीखालून धूर यायला लागला आणि काही मिनिटांत कॉम्प्रेसरने पेट घेतला. त्यानंतर या कॉम्प्रेसरजवळ असलेली केबल पेटल्याने आगीचा भडका उडाला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर प्रवाशी गाडीतून खाली उतरले. या आगीची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने घटना स्थळी गाव घेतली. फायर सिलेंडरच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली. कॉम्प्रेसरची आग पूर्णपणे विझल्यानंतर ही गाडी इगतपुरीच्या दिशेने रवाना करण्यात आली. सुदैवाने या आगीत कोणालाही दुखापत झालेली नाही.