मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला हिंदुस्थानात आणणार, हस्तांतरण प्रक्रियेला वेग

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधारांपैकी एक असलेला तहव्वूर राणा याला लवकरच हिंदुस्थानात आणण्यात येणार आहे. राजनयिक प्रक्रियेद्वारे त्याला त्याला हिंदुस्थानच्या हवाली करण्याची तयारी सुरू आहे. मुंबई हल्ल्यात तो सामील होता. ऑगस्ट 2024 मध्ये अमेरिकेतील कोर्टाने या प्रकरणी आपला निकाल दिला होता. कोर्टाने हिंदुस्थान-अमेरिका हस्तांतर करारनुसार त्याला हिंदुस्थानच्या हवाली करण्यास मंजुरी दिली होती. आता राणाला लवकरच हिंदुस्थानात आणले जाणार आहे.

तहव्वूर राणाला याला हिंदुस्थानला सोपवण्याविरोधातील याचिका अमेरिकेच्या कोर्टाने फेटाळून लावली होती. हिंदुस्थानने तहव्वूर राणाविरोधात पुरेसे पुरावे सादर केले आहेत, असे कोर्टाने नमूद केले होते. मुंबई पोलिसांनी दहशतवादी हल्ला प्रकरणातील आरोपपत्रात तहव्वूर राणाच्या नावाचा समावेश केला होता. राणावर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि दहशतवादी संघटना लश्कर ए तोयबा यासाठी काम करत असल्याचा आरोप आहे.

काय आहेत राणावर आरोप?

तहव्वूर राणाने हल्ल्यातील आणखी एक मास्टरमाइंड डेविड कोलमन हेडलीला मदत केली होती. या हल्ल्यासाठी राणाने मुंबईतील ठिकाणांची रेकी केली होती, असा आरोप आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या जवळपास एक वर्षानंतर तहव्वूर राणा याला अमेरिकेची तपास संस्था एफबीआयने शिकागोमध्ये अटक केली होती.