मुंबईचे तापमान 35 अंशांवर

गेले काही दिवस विक्रमी पातळीवर राहिलेले मुंबईचे तापमान गुरुवारी 35 अंश इतके नोंद झाले. कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक नोंद झाल्यामुळे मुंबईकरांना उन्हाचे तीव्र चटके सोसावेच लागत आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यभरात उष्णतेची तीव्रता प्रचंड वाढली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस मुंबई शहरातील कमाल तापमान 36 ते 37 अंशांच्या आसपास राहणार आहे.