
मुंबईत रात्रभर झालेल्या तुफान पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून पहाटेपासून ठाण्याकडून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक पूर्णपणे बंद होती. मात्र आता ही वाहतूक धीम्या मार्गावर सुरू करण्यात आली आहे. अद्याप जलद मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. धीम्या मार्गावरील लोकल देखील अत्यंत धीम्या गतीने धावत आहेत. तसेच चुनाभट्टी स्थानकावर मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याने या हार्बर मार्गावरील सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.
मुसळधार पावसामुळे ठाण्याकडून मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे सेवा बंद पडली होती. मात्र आता रेल्वे ट्रॅकवरील पाणी कमी झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक आता धीम्या गतीने सुरू झाली आहे. #centralrailway #MumbaiRain #HeavyRain #rainalert pic.twitter.com/rKuUtmX9Eb
— Saamana (@SaamanaOnline) July 8, 2024