
मुंबईत गेल्या काही तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात तसेच रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या देखील वेगवेगळ्या स्थानकात अडकल्या होत्या. याचा फटका महाराष्ट्रातील आमदारांना देखील बसला. अधिवेशन सुरू असल्याने एक्सप्रेसने मुंबईच्या दिशेने निघालेले काही आमदार देखील एक्सप्रेसमध्ये अडकले आहेत. दरम्यान अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील व आमदार अमोल मिटकरी हे ट्रॅकवरून चालत निघाल्याचे समोर आले आहे.
पावसामुळे सायन – कुर्ला लाल बहादूर शास्त्री मार्ग पाण्याखाली#Mumbairain pic.twitter.com/gn2JzpA9EC
— Saamana (@SaamanaOnline) July 8, 2024
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार अनिल पाटील, आमदार संजय गायकवाड हे या एक्सप्रेसमध्ये अडकले असून त्यांच्या व्यतिरिक्त आणखी सहा ते आठ आमदार या एक्सप्रेसमध्ये अडकले आहेत असे समजते.
मुंबईत रविवारी रात्री 1 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी 300 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. मुंबईतील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून उपनगरीय रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे. #Mumbairain pic.twitter.com/sjULr7zV5X
— Saamana (@SaamanaOnline) July 8, 2024