Mumbai Rain: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; पाणी कपात होणार रद्द

>> देवेंद्र भगत, मुंबई

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावात मिळून 67 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तलाव क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्याने मुंबईत 5 जून पासून सुरू असलेली 10 टक्के पाणी कपात सोमवार 29 जुलै पासून रद्द करण्यात करण्याचा विचार सुरू असल्याचे पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी ‘सामना’शी बोलताना सांगितले.

मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणातून मुंबईला दररोज 3,850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी 14 लाख 47 हजार 343 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. यंदा जून महिन्यात पावसाने धरण क्षेत्रात पाठ फिरवल्याने मुंबईत 5 जूनपासून 10 टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. मात्र जुलै महिन्यापासून पावसाची जोरदार इनिंग सुरू झाल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.

ताज्या बातम्या आणि जलद अपडेटसाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

सामना न्युज एक्सप्रेस | Saamana News Express

मार्च महिन्यापर्यंत पुरणारे पाणी झाले जमा

सात तलावांत एकूण 966395 दशलक्ष लिटर पाणी जमा, मुंबईला दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा पाहता हे पाणी पुढील 251 दिवसांसाठी म्हणजेच मार्च महिन्यापर्यंत पुरणारे आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)