एलईडी वाहनातून केले जाणार रेबीज लसीकरण, प्रतिबंधासाठी जनजागृती   

मुंबईकरांमध्ये रेबीज लसीकरण आणि प्रतिबंधासाठी जनजागृती करण्यासाठी मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला असून विशेष संदेश देणाऱ्या चित्रफितींसह एलईडी वाहन तयार करण्यात आहे. या वाहनाच्या माध्यमातून सर्व प्रशासकीय विभागांमध्ये (वॉर्ड) जनजागृती करण्यात येणार आहे. प्रामुख्याने उच्च जोखीम असलेला परिसर आणि दाट लोकवस्तीच्या परिसरांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे. मुंबईतील प्राणी कल्याण आणि प्राण्यांपासून होणारे संक्रमण टाळण्यासाठी पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, उपायुक्त चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर हा जनजागृतीपर उपक्रम हाती घेण्यात आला आहे.