मुंबई बंदरचे जेतेपदावर शिक्कामोर्तब

यजमान मुंबई बंदरने दीपक सोरेनच्या एकमेव गोलच्या जोरावर अखिल हिंदुस्थानी मुख्य बंदरे हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत एसएमपीए (कोलकाता)संघाचा 1-0 ने पराभव करत बाजी मारली. चेन्नई बंदरने पारादीप बंदरचा 9-1 असा धुव्वा उडवत स्पर्धेतील तिसरे स्थान संपादले. मुंबई बंदरचा लक्ष्मीकांत कावळे ‘मालिकावीर’ ठरला तर एसएमपीएच्या कमल चिकला ‘सर्वोत्तम आक्रमका’चा पुरस्कार लाभला. मुंबई बंदरचा सिज्जिन जारुपुल्ला हा सर्वोत्तम गोलरक्षक ठरला. स्पर्धेचा पुरस्कार सोहळा मुंबई बंदर क्रीडा परिषदेचे सचिव डॉ. पी.ए. बहेकर, आंतरराष्ट्रीय हॉकीपटू धनंजय महाडिक यांच्या हस्ते पार पडला.