विद्यार्थ्यांनो, सावध रहा, खबरदारी घ्या! मुंबई विद्यापीठाच्या नावाने बनावट फेसबुक पेज, अॅडमिशनच्या निमित्ताने आर्थिक फसवणुकीची शक्यता

मुंबई विद्यापीठाच्या नावाने बनावट फेसबुक पेज बनवण्यात आले आहे. त्यावर विद्यार्थ्यांना अॅडमिशनसाठी आवाहन करण्यात येत असून हॅकर्सच्या या काव्याला बळी पडून विद्यार्थ्यांची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा तातडीने अलर्ट झाली असून सायबर क्राईम विभागाने विद्यार्थ्यांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई विद्यापीठ हे जगात विख्यात आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी मुंबई विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेत असतात. विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या प्रवेशांवेळी विविध शुल्कांच्या माध्यमातून विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक व्यवहार होत असतो. त्यामुळेच ऑनलाईन फसवणूक करणाऱया गुन्हेगारांनी मुंबई विद्यापीठाचेच फेसबुक पेज तयार करून त्यावर ऑनलाईन प्रवेशही सुरू केले आहेत.

सायबर क्राईम विभागाकडे यासंदर्भात अधिकृत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई विद्यापीठाच्या नावाने https://www.facebook.com/share/1ALkntvz9o/ या लिंकवर बनावट फेसबुक पेज आढळून आले आहे. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना त्यावर आपले नाव, ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक टाकण्यास सांगण्यात आले आहे.

विद्यापीठाकडून सावधगिरीचे आवाहन

मुंबई विद्यापीठाच्या वतीने फेसबुकसारख्या कोणत्याही माध्यमातून प्रवेश प्रक्रिया राबवली जात नाही. त्यामुळे अशा बनावटगिरीपासून विद्यार्थ्यांनी सावध रहावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अशा स्वरुपाचे बनावट फेसबुक पेजेस किंवा वेबसाईट आढळल्यास नागरिकांनी तातडीने विद्यापीठाला किंवा पोलिसांना कळवावे, असेही विद्यापीठाने म्हटले आहे.

मुंबई विद्यापीठाची अधिकृत वेबसाईट आणि सोशल मीडिया अकाऊंट्स

  • वेबसाईट – www.mu.ac.in
  • फेसबुक – //www.facebook.com/share/16NYoF47Qr/?mibextid=wwXIfr
  • इंस्टाग्राम – @uni_mumbai https://www.instagram.com/invites/contact ?igsh=1waqe9cui2ljn&utm_content=frrdwsd
  • यूटयूब – https://youtube.com/@universityofmumbai_uom?si=Cn8v_VbmdtbuebSF
  • व्हॉट्सअप – https://whatsapp.com/channel/0029Vb1yiOPK0IBi6rHdBw41