शाहरुख खानला धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात, रायपूर येथून केली अटक

बॉलीवूड किंग शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शाहरुखकडून 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या वकील फैजान खानला पोलिसांनी छत्तीसगडमधील रायपूर येथून अटक केली आहे. फैजानला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यासाठी पोलीस ट्रान्झिट रिमांडची प्रक्रिया पूर्ण करत आहेत.

फैजानने 5 नोव्हेंबर रोजी वांद्रे पोलीस स्टेशनच्या लॅण्ड लाईनवर शाहरुख खानला धमकीचा फोन आला होता. फैजान खान नावाच्या व्यक्तीने मुंबई पोलीसांना सांगितले की, त्याने आपला मोबाईल 2 नोव्हेंबर रोजी चोरी झाल्याची तक्रारही दाखल केली होती. वांद्रे पोलिसांच्या एफआयआरमध्ये असं नमूद केलंय की कॉलरने शाहरुख खानकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. ही मागणी पूर्ण न केल्यास अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

धमकीमध्ये बँडस्टॅण्ड येथील मन्नत बंगल्यात राहत असलेल्या शाहरुख खानने मला 50 लाख रुपये दिले नाही तर जीवे मारेन. अशी धमकी फोनद्वारे देण्यात आली होती. त्यानंतर पोलीस संतोष धोडके यांनी फोन करणाऱ्याची ओळख आणि ठिकाणाबद्दल चौकशी केली असता धमकी देणाऱ्याने म्हटले होते, “त्याने काही फरक पडत नाही. तुम्हाला काही लिहायचं असेल तर माझं नाव हिंदुस्थानी असं लिहा.”