मुंबई पोलिसांना धमकीचा फोन, पंतप्रधानांच्या विमानावर दहशतवादी हल्ल्याचा संशय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याआधी मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने पंतप्रधानांच्या विमानावर दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली आहे. पोलिसांनी तात्काळ संबंधित सुरक्षा एजन्सींना याबाबत माहिती दिली. यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीचा कसून शोध घेत त्याला अटक केली आहे.

पंतप्रधान मोदी सध्या तीन दिवसांच्या फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. मोदींच्या अमेरिका दौऱ्याआधी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये मंगळवारी एका अज्ञात व्यक्तीने फोन केला. फोन करणाऱ्या व्यक्तीने पंतप्रधानांच्या विमानावर दहशतवादी होऊ शकतो, असे सांगितले. पोलिसांना फोन करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. आरोपी व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले.