अनंत अंबानीच्या लग्नात बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या इंजिनियरला अटक

मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नात बॉ्म्बस्फोट होणार असल्याची धमकी देणाऱ्या इंजिनियरला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. विरल शाह असे त्या तरुणाचे नावे असून गुजरातमधून त्याला अटक केली आहे. विरल हा गुजरातमधील वडोदरा येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.

विरल शाह याने अनंतच्या लग्नाच्या दिवशी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ”अंबानींच्या लग्नात जर बॉम्बस्फोट झाला तर अर्धे जग उलटेल. एका पिन कोडमध्ये ट्रिलियन डॉलर्स”, अशी पोस्ट विरलने केली होती. या पोस्टनंतर अनंतच्या लग्नातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती.