
युवासेना सिनेट सदस्य तसेच (बुक्टू) शिक्षक मतदार संघाचे सिनेट सदस्य यांच्यावतीने विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱयांनी आज विविध मागण्यांसाठी मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट परिसरात धरणे आंदोलन केले. शांततेच्या मार्गाने सुरू असलेले हे आंदोलन दपडण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात तीन तास बसवून नंतर सोडून दिले. या पोलिसी कारवाईचा युवासेना आणि बुक्टूने निषेध केला आहे.
आज झालेल्या आंदोलनात युवासेनेचे सिनेट सदस्य शशिकांत झोरे, अल्पेश भोईर, किसन सावंत आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर तर बुक्टू संघटनेच्या ज्येष्ठ नेत्या तप्ती मुखोपाध्याय, मधू परांजपे, शांती पोलिमोरी, अनुपमा सावंत, ज्योती पेटकर, स्वाती लावंड, चंद्रशेखर कुळकर्णी, जितेंद्रनाथ झा, हनुमंत सुतार, सखाराम डाखोरे, सोमनाथ कदम, ताहीर मोहम्मद, उत्तम यादव, शरद त्रिपाठी आदी शिक्षक उपस्थित होते.
आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या
- मुंबई विद्यापीठातील पंत्राटी शिक्षकेतर कर्मचारी अनेक वर्ष तुटपुंज्या पगारात काम करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना न्याय देण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना सर्वसामान्य कर्मचाऱयांसारख्या इतर सवलती द्याव्यात.
- विनाअनुदानित शिक्षक आणि अनुदानित शिक्षकांच्या वेतनश्रेणीत समानता जाणण्यासाठी परिपत्रक जारी करावे.
- विद्यानगरी कॅम्पसमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह स्थापन करावे. वसतिगृह बांधण्यासाठी जागा आणि किमान 5 कोटींचे बजेट विद्यापीठाने द्यावे.