
भरधाव आलेल्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाचा मृत्यू तर चालक जखमी झाल्याची घटना साकीनाका जंक्शन येथील सिग्नलजवळ घडली. याप्रकरणी ट्रकचालकाविरोधात साकिनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रेहान खान (18) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी रात्री तो मित्र उस्मान खान याच्यासोबत दुचाकीवरून जात होता. त्याचवेळेस ट्रकने त्यांना धडक दिली. यात रेहानच्या चेहरा आणि डोक्याल्या गंभीर दुखापत झाली. रेहानला राजावाडी इस्पितळात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.