
मुंबईच्या दोन मेट्रो स्थानकांचा कारभार पूर्णपणे महिलांच्या हाती आहे. एक्सर आणि आकुर्ली स्थानकांची जबाबदारी मागील दोन वर्षांपासून महिला उत्तमरीत्या सांभाळत आहेत. स्टेशन मॅनेजरपासून सुरक्षा अधिकारी बनून प्रत्येक महिला ‘हम भी कुछ कम नही’ म्हणत मेट्रो सुकाणू स्वतःच्या हातात घेऊन आहे. यानिमित्ताने एमएमआरडीए आणि महामुंबई मेट्रो रेल ऑपरेशन कॉर्पोरेशनने दिलेल्या संधीचे सोने करत आहेत.
मेट्रो 2 अ मधील आकुर्ली आणि मेट्रो 7 मार्गिकेतील एक्सर स्थानकाच्या व्यवस्थापनासह स्थानकावरील कारभार चालविण्याची संपूर्ण जबाबदारी महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. प्रत्येक स्टेशनवर साधारणपणे 70 कर्मचारी असतात. त्यापैकी 55 ते 60 महिला कर्मचारी आकुर्ली आणि एक्सर स्थानकांवर आहेत (पुरुष सुरक्षा तपासणी आणि पुरुषांचे टॉयलेट क्लिनिंग कर्मचारी वगळून).
मुंबईतील दोन मेट्रो स्थानकांचे कार्यान्वयन आणि व्यवस्थापन महिला उत्तमरीत्या सांभाळत आहेत. एक्सर आणि आकुर्ली स्थानकांवरील सर्व महिला कर्मचारी तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत. स्टेशन कंट्रोलर, तिकीट विक्री अधिकारी, शिफ्ट सुपरवायझर, टेक्निकल, सफाई, ग्राहक सेवा अधिकारी अशी विविध कामे महिला करत आहेत.