रेल्वेच्या हार्बर मार्गावरील रे रोड येथील उड्डाणपुलाजवळ जलवाहिनी फुटून परिसरात पाणीच पाणी साचल्याचा प्रकार आज दुपारच्या सुमारास घडला. यामुळे शिवडी भागातील पाणीपुरवठय़ावर परिणामही झाला.
शिवडी पूर्व परिसराला पर्ह्सबेरी जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो. या जलाशयाला संलग्न असलेली मुख्य जलवाहिनी रे रोड पुलाजवळ फुटली. यामुळे जलाशयातून मोठय़ा प्रमाणावर पाण्याची गळती झाली. पुलाच्या बाजूला यामुळे मोठय़ा प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे वाहनचालकांना पाण्यातून वाट काढताना कसरत करावी लागली.