कुर्ला, चुनाभट्टी येथे पाणीपुरवठा विस्कळीत

पवईतील निमस्तरीय जलाशयातील विद्युत उपकेंद्रात बिघाड झाल्याने आज महापालिकेच्या ‘एल’ विभागातील कुर्ला, चुनाभट्टीतील काही परिसराचा पाणीपुरवठा बंद राहिला, तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होता. दरम्यान, दुरुस्ती पूर्ण झाल्यावर पवई उच्चस्तरीय जलाशय क्रमांक 2 भरून पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात येईल. पवई निमस्तरीय जलाशय येथील 22 किलोव्होल्ट उपकेंद्रात बिघाड झाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या ‘एल’ विभागातील काही परिसरात आज पाणीपुरवठा झाला नाही. काही परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. दुरुस्तीचे काम आज पूर्ण होणार आहे. काजूपाडा, ख्रिश्चन गाव, मसरानी लेन, ए. एच. वाडिया मार्ग, वाडिया इस्टेट, एम. एन. मार्ग, बैल बाजार, संदेशनगर, क्रांती नगर, ब्राह्मणवाडी, पटेलवाडी, बुद्ध कॉलनी, एलआयजी- एमआयजी कॉलनी, विनोबा भावेनगर, प्रीमियर रेसिडेन्स, कपाडियानगर या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होता तर न्यू मिल मार्ग, मॅच फॅक्टरी लेन, तकिया परिसर, शिवाजी कुटीर, टॅक्सीमन वसाहत, इंदिरानगर, महाराष्ट्र काटा, ए. बी. एस. मार्ग, चाफे गल्ली, चुनाभट्टी, विजयनगर, जरी माता मंदिर परिसर या भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद होता.