
नवीन वर्ष सुरू झाले आहे. गुढी कुठे उभारायची आहे तुम्हाला माहीत आहे. त्या कामाला लागा, असे आदेश शिवसैनिकांना देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी पालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले.
वांद्रे पूर्वचे आमदार वरुण सरदेसाई यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. ही सगळी माणसं आपल्या हक्काची आहेत. यांचे आशीर्वाद हे आपले बळ आहे. त्यांच्या विश्वासाला कुठेही तू तडा जाऊ देणार नाही याची मला खात्री आहे, असे उद्धव ठाकरे सरदेसाई यांना म्हणाले.
- नवीन वर्षाची सुरुवात दणक्यात झाली आहे. वांद्रे पूर्व हा आपलाच इलाखा आहे आणि आपला इलाका म्हटल्यावर कामही दणक्यात झाले पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.