
मुंबईत गेट वे ऑफ इंडिया ते घारापुरी, मांडवा तसेच इतर ठिकाणी जाणाऱ्या पर्यटक बोटी या लाकडाऐवजी फायबरच्या केल्या जाणार असून त्यासाठी आवश्यक असलेले अर्थसहाय्य या बोटचालकांना दिले जाणार आहे. त्यासाठी वेगळी योजना राबवली जाईल, अशी माहिती मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकासमंत्री नितेश राणे यांनी दिले. गेट वे ऑफ इंडियामधील नीलकमल बोट दुर्घटनेवरून शिवसेनेचे सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी प्रश्न उपस्थित करून मुंबईतील जलवाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी बोटी फायबरच्या केल्या जाव्यात आणि त्यासाठी बोटचालकांना अर्थसहाय्य करावे, अशी मागणी केली होती.