
बोरीवलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मागाठणे डेपोच्या बेस्ट बसने एका तीन वर्षीय चिमुरडीला चिरडल्याची घटना घडली. मेहेक खातून शेख असे मयत चिमुरडीचे नाव आहे. बोरीवलीती राजेंद्र नगरमध्ये सोमवारी दुपारी 12.40 वाजता हा अपघात घडला.
रस्त्याच्या कडेला असलेली तीन वर्षाची मुलगी अचानक बसच्या समोरील डाव्या बाजूच्या चाकाला धडकून रस्त्यावर पडली. यानंतर बसचे चाक मुलीच्या डोक्यावरून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मुलीला तात्काळ शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.