गर्डर बसवण्याचे काम रखडले, तिन्ही मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत; प्रवाशांचे ‘मेगा’हाल

कर्नाक पुलावरील गर्डरचे काम पूर्ण हईपर्यंत मध्य रेल्वेवर ब्लॉक सुरूच ठेवण्यात येणार आहे. शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळी 5.30 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात आला होता. मात्र गर्डरचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने हा ब्लॉक पुढे वाढवण्यात आल्याचे मध्य रेल्वेने सांगितले. यामुळे तिन्ही मार्गाववरील लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. गर्डरचे काम करताना एका कर्मचाऱ्याला दुखापत झाल्याची माहिती मिळते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत आणि कार्यालयात वेळेत न पोहोचता आल्याने विद्यार्थी, सरकारी कर्मचारी, निवृत्त सैनिक यांना रेल्वे स्थानकावर झेंडा वंदन करण्याची वेळ आली. तसेच चाकरमान्यांना वेळेत पोहोचता न आल्याने लेटमार्कही लागला.

दरम्यान, ब्लॉक पूर्ण होईपर्यंत भायखळा आणि दादर येथून मुख्य मार्गावर आणि वडाळा रोडवरून उपनगरीय आणि मेल एक्सप्रेस गाड्या सुटणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी, दादर, भायखळा आणि वडाळा रोड येथे बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.