Mumbai News – स्वामींच्या पादुका-पालखी सोहळा

विलेपार्ले पूर्व येथील श्री स्वामी समर्थ मठ यांच्या विद्यमाने उद्या, शुक्रवारी सकाळी 11 ते रात्री 11 या वेळेत अक्कलकोट अन्नछत्र मंडळातील श्री स्वामी महाराजांच्या पादुका-पालखी सोहळा गोखले रोड, चटवानी बाग हॉल, विलेपार्ले स्टेशनजवळ आयोजित केला आहे. तसेच 26 एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ महाराज समाधी दिनानिमित्त सकाळी 8 पासून दर्शनाची विशेष व्यवस्था केली आहे. अशी माहिती मठाचे अध्यक्ष महादेव शहापूरकर व विश्वस्त विनय कंटक यांनी दिली.