हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून प्रबोधन गोरेगाव व दृष्टी परिवार संघटनेने गोरेगावच्या प्रबोधन क्रीडा भवनात दृष्टिहीनांसाठी आयोजित बुद्धिबळ स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रबोधन गोरेगावचे संस्थापक व शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेला 70 अंध खेळाडूंचा सहभाग लाभला होता.यादरम्यान अंध कलाकारांच्या वाद्यवृंदांचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दृष्टी परिवाराचे अध्यक्ष ज्ञानेश जोशी, अतुल केंकरे आणि प्रबोधन गोरेगावच्या सदस्यांनी मेहनत घेतली.