लोअर परळमध्ये भीषण अपघात, भरधाव कारची टॅक्सीला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

भरधाव कारने टॅक्सीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना लोअर परळमध्ये घडली. सेनापती बापट मार्गावरील एलफिन्स्टन पुलावर शनिवारी दुपारी 12 वाजता ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

भरधाव कारने समोरून टॅक्सीला धडक दिली. यात टॅक्सीचा चक्काचूर झाला. अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही.