गुंडगिरी बंद करायचं सोडून आरोपींना आयसीयूत कसले टाकताय, असं मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी मुलगी वैभवी देशमुख म्हणाली आहे. आज संतोष देशमुख हत्येप्रकरणी मुंबईत जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आलं होतं. याचवेळी माध्यमांशी संवाद सोडताना वैभवी देशमुख असं म्हणाली आहे.
वैभवी देशमुख म्हणाली की, ”लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे. जे कोणी आरोपी आहेत आणि जे त्यांना मदत करत असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे.”
वैभवी पुढे म्हणाली की, ”जे आरोपी (वाल्मीक कराड) आहेत, त्यांना आयसीयूमध्ये दाखल केलं आहे. ज्यावेळी माझ्या वडिलांचे इतके हाल केले, त्यावेळी त्यांना हा विचार का नाही आला? आपल्याला महाराष्ट्रातील गुन्हेगारी ही बंद करायची आहे. मात्र तुम्ही आरोपीला असेच आयसीयूमध्ये ठेवत असाल तर पुढची गुन्हेगारी ही वाढेल. कारण जो गुन्हा करेल त्याला वाटेल की, तुरुंगात खूप छान असतं, आपल्याला सगळ्या सुविधा पुरवल्या जातात. आपल्याला गुन्हेगारी कमी करायची आहे, वाढवायची नाही. त्यासाठी माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की, जे कोणी आरोपी आहेत, त्यांचा व्यवस्थित तपास करा आणि माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्या.”