
शिवसेना – युवासेना दिंडोशी विधानसभा पुरस्कृत गोकुळवन मित्र मंडळ यांच्या वतीने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा तसेच आमदार चषक सामन्यास खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दुसऱ्या दिवशी मालाड सक्षम संघाने उत्कृष्ट चढाई करीत घाटकोपरच्या पंचवटी संघाला पराजित केले.
दिंडोशी येथील आमदार चषक कबड्डी सामान्यात सलग दिवशी प्रेक्षकांची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शिवसेना नेते, आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात शिवसेनेचे नेते, आमदार अनिल परब यांची उपस्थिती लाभली. शिवसेनेचे प्रवत्ते आनंद दुबे, उत्तर भारतीय एकता मनसे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक तिवारी, शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक विनोद कुमार सिंग, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अजितराव राणे, मुंबई सचिव रघुनाथ कोठारी, काँग्रेसचे जयकांत शुक्ला आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.
प्रो कबड्डी स्टार खेळाडू ऋतुराज कोरवी अजिंक्य खापरे यांनी यावेळी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. यावेळी आमदार सुनील प्रभू यांनी अजिंक्य खापरे आणि आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेती सुवर्णा बारटक्के – पालव यांचाही सत्कार केला.