
दिल्लीहून मुंबईला येत असलेल्या अकासा विमानात एका प्रवाशाने विमान सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले. विमानातील शौचालयात धूम्रपान केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. शुभंकर शर्मा असे अटक प्रवाशाचे नाव आहे.
अकासा एअर फ्लाइट QP 1128 विमानाने दिल्लीहून शुक्रवारी दुपारी 4 वाजता मुंबईसाठी उड्डाण घेतले. यानंतर 5.30 च्या सुमारास विमान हवेत असताना शौचालयातून स्मोक डिटेक्टर अलार्म वाजल्याचे लक्षात आले. त्याने शौचालयाजवळ जाऊन तपासले असता आत धूर येत असल्याचे पाहिले. त्याने दरवाजा ठोठावला असता आतून शुभंकर बाहेर आला आणि त्याने धूम्रपान केल्याचे कबूल केले.
क्रू मेंबरने सिगारेटबाबत विचारले असता शुभंकरकडे ग्रीन लाईटर दाखवला. क्रू मेंबरने हा लाईटर जप्त केला. या घटनेची माहिती तातडीने फ्लाइट कॅप्टन पंकज निवास यांना देण्यात आली. त्यानंतर सायंकाळी 6.30 वाजता विमान मुंबईत दाखल झाल्यानंतर सुरक्षा पथकाला याबाबत माहिती देण्यात आली.
पुढील चौकशीसाठी विमानतळ पोलिसांकडे शर्माला सोपवण्यात आले. एअरलाइन सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल शर्माविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.