
नैरोबी येथून कोकेन घेऊन आलेल्या प्रवाशाला सीमा शुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. त्याच्याकडून 17. 89 कोटीचे कोकेन जप्त केले. तो प्रवासी नेमके कोणाला कोकेन देणार होता, त्याचा तपास सीमा शुल्क विभाग करत आहेत. मंगळवारी सीमा शुल्क विभागाचे अधिकारी विमानतळावर गस्त करत होते. यावेळी नैरोबी व्हाया डोहा असा प्रवास करून एक प्रवासी हा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला ताब्यात घेतले.