लिफ्टमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग 

लिफ्टमध्ये सुरक्षा रक्षकाने अल्पवयीन मुलीशी नकोसे कृत्य केल्याची घटना घडली. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी सुरक्षा रक्षकाला अटक केली. पीडित मुलगी ही मुलुंड परिसरात राहते. शनिवारी सायंकाळी मुलगी लिफ्टमधून जात होती. तेव्हा सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने तिच्याशी नकोसे कृत्य करून तिचा विनयभंग केला. घरी आल्यावर मुलीने घडल्या प्रकाराची माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी मुलुंड पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलुंड पोलिसांनी गुन्हा नोंद करून सुरक्षा रक्षकाला अटक केली.