जाड्या बोलला म्हणून अल्पवयीन मुलावर चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना मुंबईतील अँटॉप हिल परिसरात घडली. हल्ल्याप्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल केला आहे.
पीडित मुलाने आरोपीला जाड असे संबोधल्याने दोघांमध्ये वाद झाला होता. यानंतर पीडित मुलगा रात्रीच्या सुमारास एका बागेजवळ उभा असतानाच आरोपी मित्रासह तेथे आला. यावेळी पुन्हा त्यांच्यात भांडण झाले. भांडण विकोपाला गेले. यानंतर आरोपीच्या मित्राने पीडिताला पकडले आणि आरोपीने त्याच्यावर चाकूने हल्ला केला.
पीडित मुलाच्या छातीत गंभीर जखम झाली असून त्याच्यावर सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात रुग्णालयात उपचार सुरू आहेत.