Megablock रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी पश्चिम, मध्य आणि हार्बर अशा तिन्ही रेल्वेमार्गांवर उद्या, रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. या कालावधीत काही गाड्या उशिराने धावणार आहेत तर काही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी रेल्वेचे वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.52 वाजेपर्यंत डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. पुढे मुलुंड डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सकाळी 11.07 ते दुपारी 3.51 वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाडय़ा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील व यादरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील व पुढे अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील.