Dharavi Fire – धारावीत अग्नितांडव, एका पाठोपाठ 5 सिलेंडर स्फोट

धारावी परिसरात भीषण आग लागल्याची बातमी समोर येत आहे. धारावीच्या बस डेपोजवळ गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रकमध्ये ही आग लागली. एकामागून एक 4 ते 5 सिलेंडरचे स्फोट झाल्याचं समजतं आहे. हा स्फोट इतका भीषण होता की परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा जखमींबद्दल माहिती समोर आलेली नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाचे पथक आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे.