वांद्रे येथील इमारतीत आग, एकाचा होरपळून मृत्यू

बीकेसी येथील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागलेल्या आगीत एका 50 वर्षीय व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री सव्वातीनच्या सुमारास घडली. तर एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वांद्रे-कुर्ला संकुलातील जी ब्लॉग येथील तळ अधिक 20 मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर वातानुकूलित यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे आग लागली. काही वेळात आग वाऱ्यासारखी पसरली आणि इमारतीत धुराचे लोण पसरले. या आगीत दोघेजण गंभीररित्या भाजले.

दोघा जखमींना जवळील केएलएस या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तारानाथ (50) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सुनीत पाल (30) यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.