चार्जिंगदरम्यान आयफोनचा स्फोट, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने विचारला जाब

वरळीतील एका ग्राहकाने क्रोमा इलेक्ट्रॉनिक्समधून खरेदी केलेल्या आयफोनचा चार्ंजग वेळी स्फोट झाला. या प्रकरणी ग्राहकाच्या तक्रारीनंतर शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने क्रोमा इलेक्ट्रॉनिक्सच्या व्यवस्थापनाच्या अंधेरीतील कार्यालयाला धडक देत त्यांना जाब विचारला. तसेच या ग्राहकाला नवीन आयफोन देण्याची मागणी केली.

वरळीतील एका ग्राहकाने क्रोमा इलेक्ट्रॉनिक्समधून आयपह्न विकत घेतला. परंतु अवघ्या दोन महिन्यांत चार्ंजग करते वेळी आयफोनचा स्पह्ट झाला. सुदैवाने या स्पह्टात कोणतीही जीवित हानी झाली नाही. संबंधित ग्राहकाने त्वरित झालेली घटना शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या पदाधिकाऱयांच्या निदर्शनास आणली. शिवसेना नेते, खासदार आणि शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष अनिल देसाई यांच्या आदेशानुसार कक्षाचे सचिव निखिल सावंत यांच्या नेतृत्वामध्ये शिष्टमंडळाने क्रोमा इलेक्ट्रॉनिक्सच्या व्यवस्थापनाच्या अंधेरी येथील कार्यालयाला धडक दिली. या प्रकारास क्रोमा इलेक्ट्रॉनिक्स जबाबदार आहे की अॅपल कंपनी याचा खुलासा मागितला. त्याचबरोबर निकृष्ट दर्जाच्या आयफोनची ग्राहकांना कोणातर्फे विक्री करण्यात आली याची सखोल चौकशी करण्याची तसेच सदर ग्राहकाला त्वरित नवीन फोन देण्याची मागणी कक्षाच्या वतीने करण्यात आली.

क्रोमा इलेक्ट्रॉनिक्सचे व्यवस्थापक पाटील यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत यावर तोडगा काढू, असे आश्वासन दिले. सदर शिष्टमंडळात कार्यकारणी सदस्य बबन सकपाळ, कक्ष लोकसभा समन्वयक संजय पावले, कक्ष विधानसभा संघटक कृष्णकांत शिंदे, राम साळवी, रवींद्र चिले, विक्रम शहा, कार्यालय चिटणीस राजेश चव्हाण, अरविंद देशमुख, उपसंघटक विजय पवार, यश, संतोष जाधव व तक्रारदार अजित कदम आदी उपस्थित होते.