प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ताराराणी यांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर याचा कोल्हापूर सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कोरटकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सोमवारी हायकोर्टात न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या एकलपीठासमोर सुनावणी होणार आहे. दरम्यान प्रशांत कोरटकर मुंबईतच असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि ताराराणी यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी कोरटकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर सत्र न्यायालयाने कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अ‍ॅड.सौरभ घाग यांच्यामार्फत अर्ज केला. या अर्जावर न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्यासमोर प्राथमिक सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी अतिरीक्त सरकारी वकील अजय पाटील यांनी याचिकेची प्रत मिळाली नसल्याचे सांगितले होते. न्यायालयाने याची दखल घेत याचिकेची प्रत देण्याचे आदेश कोरटकरच्या वकिलांना दिले होते व सुनावणी 24 मार्च पर्यंत तहकूब केली होती.