रामनवमीनिमित्त अखंड विश्वशांती हरिनाम सप्ताह

श्री रामनवमीनिमित्त दादरमधील गोखले मार्गावरील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात अखंड विश्वशांती हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा हरिनाम सप्ताह 7 एप्रिलपर्यंत सुरू राहणार असून कीर्तनाची वेळ संध्याकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत आहे. 31 मार्चला हभप भरतदादा अलिबागकर महाराज, 1 एप्रिलला हभप मारुती महाराज पवार, 2 एप्रिलला हभप तुकाराम महाराज शिंदे, 3 एप्रिलला हभप नागेश महाराज बागडे, 4 एप्रिलला हभप मोहन महाराज मलंगणेर, 5 एप्रिलला हभप ज्ञानेश्वर महाराज शिंदे, 6 एप्रिलला गुरुवर्य नारायणदादा अलिबागकर महाराज यांचे श्रीराम जन्मउत्सवानिमित्त कीर्तन सकाळी 10 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत. 7 एप्रिलला गुरुवर्य हभप नारायणदादा अलिबागकर महाराज यांचे सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत काल्याचे कीर्तन होणार आहे. 6 एप्रिलला संध्याकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत हळदीकुंकू समारंभ ठेवण्यात आला आहे.