गोरेगाव पूर्वेला होणार शासकीय सुविधा केंद्र, शिवसेनेच्या मागणीला यश

शिवसेनेच्या मागणीला यश आले असून गोरेगाव पूर्वेला स्टेशनलगत शासकीय कार्यालयासाठी जागा उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे शिधा वाटप कार्यालय, नगर भूमापन कार्यालय, तलाठी कार्यालय व शासकीय सुविधा केंद्र अशा सुविधा गोरेगावकरांना मिळणार असून त्यांची गैरसोय दूर होणार आहे.

गोरेगाव पूर्वेला स्टेशनलगत असलेला गुरांचा बाजार हटवून बेस्ट स्थानकाचा विस्तार करावा आणि शासकीय कार्यालय तसेच मार्केट उभारावे यासाठी शिवसेनेने वारंवार आंदोलन केले होते. शिवसेनेच्या यशस्वी आंदोलनानंतर आता येथे शासकीय कार्यालयासाठी जागा उपलब्ध होणार आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी सातत्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे नुकतीच या मोकळ्या जागेची नगर भूमापन अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, उपनेते अमोल कीर्तिकर, शिवसेना पदाधिकारी सुधाकर देसाई, शीला राठोड, लीला माने, प्रवीण माईनकर, राजू राजपूत तसेच नगर भूमापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.