
जेसीबीने जोरदार धडक दिल्यामुळे कचरावेचक महिला जागीच ठार झाल्याची घटना आज सीपी तलाव येथील कचरा संकलन केंद्रात घडली. राजश्री जाधव ( 48 ) असे मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी महिलेचे नाव असून याप्रकरणी जेसीबी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यातील सिटी तलाव येथे शहरात रोज जमा होणाऱ्या कचऱ्याचे संकलन करण्यात येते. तसेच त्याच ठिकाणी कचऱ्याचे वर्गीकरण देखील केले जाते. यासाठी 70 ते 80 महिला रोज काम करतात. राजश्री जाधव ही सुद्धा कचरा वर्गीकरणाचे काम करत असताना आज संध्याकाळी जेसीबीचा धक्का तिला लागला. ही धडक इतकी भयानक होती की गंभीर दुखापत होऊन ती जागीच ठार झाली. राजश्री जाधव ही भीमनगर परिसरात राहत होती. तिच्या निधनामुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.