महसूल विभागाच्या चकरा मारून वैतागला, कंटाळून तरुणानं मंत्रालयातील संरक्षक जाळीवर घेतली उडी

मंत्रालयातल्या संरक्षक जाळीवर उडी मारत एका तरुणाने आंदोलन केल्याची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महसूल विभागात या तरुणाचं एक प्रकरण होतं. मात्र वारंवार चक्र मारूनही काम होत नव्हतं. यातच सरकारचे लक्ष वेधण्यसाठी या तरुणाने आज थेट मंत्रालयातील जाळीवर उडी मारली. त्यामुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली. या घेतानाच व्हिडीओ समोर आला आहे.

मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून या तरुणाने उडी मारली होती. उडी मारल्यानंतर तो इंकिलाब जिंदाबादच्या घोषणा देत होता. दरम्यान, पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. पोलीस याप्रकरणी तरुणाची चौकशी करत आहेत.