मांजर लपवली म्हणून पाच वर्षाच्या मुलीसोबत अमानुष कृत्य, शेजारणीला अटक

पाळीव मांजर लपवल्याच्या रागातून पाच वर्षाच्या मुलीला अमानुष मारहाण करत चटके दिल्याची घटना गोवंडीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 38 वर्षीय महिलेला अटक केली आहे. निशाद शेख असे अटक महिलेचे नाव आहे. मुलीवर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे.

गोवंडीतील शिवाजी नगर परिसरात पीडित मुलीचे कुटुंब तीन महिन्यांपासून राहतात. त्यांच्या शेजारी निशाद खान ही महिला राहते. निशादची पाळलेली मांजर सापडत नव्हती. तिने पीडित मुलीला आपली मांजर कुठे आहे अशी विचारणा केली, मात्र मुलीने काहीच सांगितले नाही. यानंतर निशादने तिला मारहाण केली.

निशादने मुलीला मारहाण करत लोखंडी रॉडने तिच्या उजव्या पायाला चटका दिला. मुलीने घरी येऊन पालकांना याबाबत सांगितले. यानंतर पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी निशादला अटक केली आहे.