![gbs virus](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/gbs-virus-696x447.jpg)
पुण्यानंतर आता मुंबईत गुलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस)चा शिरकाव झाला आहे. मुंबईत जीबीएसचा रुग्ण आढळून आला आहे. अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीची जीबीएसची चाचणी पॉझिटिव्ह आली असून, त्याला उपचारासाठी महापालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जीबीएसचा पहिला रुग्ण आढळल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
पुण्यात जीबीएसचा वेगाने प्रसार होत असून रुग्णांचा आकडा 173 वर पोहचला आहे. जीबीएसमुळे आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून 21 जण व्हेंटिलेटरवर आहेत. पुण्यानंतर आता मुंबईत जीबीएसचा शिरकाव केल्याने मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जीबीएलच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.