
लालबागच्या डॉ. एस. एस. राव रोडवरील तळ अधिक चार मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील घरात गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत चार जण गंभीररीत्या होरपळल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन जण तब्बल 70 ते 80 टक्के भाजले असून तिघांना चिचपोकळी येथील कस्तुरबा तर एकाला मसीना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणात गॅस सिलिंडर वितरण करणाऱयाची चूक होती की घरातील कोणाच्या चुकीमुळे आग लागली हे तपासानंतर समोर येईल, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख रवींद्र आंबुलेकर यांनी दिली.
गळफास लागून मुलीचा मृत्यू
घरातील सीडीला दोरीचा फास लागल्याने सात वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गोवंडी येथे घडली. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच हळहळ व्यक्त होत असून शिवाजी नगर पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. आपृती सिंग (7) असे या मृत मुलीचे नाव असून ती गोवंडीच्या बैगणवाडी परिसरात राहत होती.