मुंबईतील फोर्ट परिसरातील इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबईतील फोर्ट परिसरातील भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शनिवारी फोर्ट परिसरातील फ्रीमेसन्स हॉलमध्ये आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनासथळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग नेमकी कशी लागली, याबाबत अद्याप अधिक माहिती कळू शकलेली नाही.